This ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
हसण्यात चीज माझ्या
देहात वीज माझ्या
फांदीवरील पक्ष्या
डोळ्यात नीज माझ्या
मम पाउले न थकली
चपलेस झीज माझ्या
या बहरल्या मनाचे
आत्म्यात बीज माझ्या
म्हणते तुला ‘सुनेत्रा’
गझलेत भीज माझ्या
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.