झालरीचा घेर असुदे वा चुडी ती चुस्त असुदे
ही गझाला दक्ष रमणी प्रीत बोली रम्य असुदे
तीन असुदे चार असुदे लक्ष अथवा अब्ज असुदे
नेत्र उघडुन पाहणारे लक्ष्यभेदी भक्त असुदे
मौन असुदे वा पुकारा ध्यास जीवा रंगण्याचा
मुग्ध हृदयी फूल जपण्या प्रेम सच्चे फक्त असुदे
मज नको फुकटात काही बंगला गाडी मळा रे
सर्व मी मिळवेन अलबत वाहणारे रक्त असुदे
नजरभेटी धीट आणी काळजाचे चोरकप्पे
उमटण्या गझलेत नवथर भावभरले शब्द असुदे
बदलणारे दिवस सुंदर माह बारा ज्यात ऐसे
वर्ष असुदे साल असुदे नाव त्याचे अब्द असुदे
पाच असुदे सात असुदे तोडणारे शेर असुदे
गझल टिकण्या पण सुनेत्रा फक्त थोडी शिस्त असुदे
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.
2 responses to “गझाला – GAZAALAA”
वाह वा वा ! आह आहा !! काय बोलू काय नाही !
कोणताही शब्द नाही, बस मने अभिसिक्त असु दे!!
बस्स… हीच प्रतिक्रिया!!!
Thanks Vinod bhaiyaa…