Aatm-hansa means soul in our heart. Soul’s aim is to become free from all ugly relations. Inner voice means our soul’s voice. It comes from our heart. Ghazal means madness taken for good task.
कमळ, मोगरा, गुलाब तू तर;
गुलाम कसला, नबाब तू तर!
आत्महंस तू, मुला-फुलातिल;
कुरूप म्हणती, खराब तू तर!
सुगंध भरले, श्वास सांगती;
अस्तित्वाचा, रुबाब तू तर!
खास गुपित, सुंदर प्रीतीचे;
माझी नाजूक, बाब तू तर!
हाय! नमस्ते, हृदयापासुन;
जय जय, मुजरा, अदाब तू तर!
वाइन, मदिरा, भांग गझलमय;
शिशिरामधली शराब तू तर!
मित्र, पिता अन आत्मजसुद्धा;
नात्यांचा मधुर आब तू तर!
सुमार म्हणती, गझल कुरूपा;
विचार तयांना, जाब, तू तर!
आन्सर, उत्तर, काही असुदे;
सवाल पुसता, जवाब तू तर!
माणसातले, भुजंग कपटी;
कापित जाशी, कसाब तू तर!
ड्रीम, स्वप्न की, कणस म्हणू मी;
स्वर्ग, समवशरण, ख्वाब तू तर!
द्रवापासुनी, वायू-अग्नी
संयम निराळा, दाब तू तर!
हनी, शर्करा, अर्क, कस्तुरी;
कवि हृदयातिल शबाब तू तर!
फूल होउनी, आरशात बघ;
फेक मुखवटा, नकाब, तू तर!
पुस्तक, पदवी, अर्थ मराठी;
ग्रंथ प्रीतिचा, किताब तू तर!
भाषा बीषा आंबट चिंबट;
अनाब मी अन, शनाब तू तर!
हिशेब, ताळा, कळेल त्यांना;
विचारशिल जर, हिसाब, तू तर!
सांब, सदाशिव, पिता जयाचा;
साहिब, सम्राट, साब तू तर!
वार जिभेने, जपून करना;
प्राणी जरी ते, जित्राब, तू तर!
खास सवारी, तुझ्याचसाठी;
भो अस्मादिक, जनाब, तू तर!
शशांक, शशधर, चाँद, चन्द्रमा;
मून धवल, आफताब तू तर!
जमीन अपुल्या, नवगझलेची;
फुलवणारे, तेजाब तू तर!
सुंदरातले अतीव सुंदर;
गझलशिल्प, लाजवाब तू तर!
गतकाळाचे, पाप-पुण्य ना;
पुण्य आजचे, सवाब तू तर!
भाषाभगिनी मधले, अमृत;
प्राशण्यात, कामयाब तू तर!
याद पुराणी हवीहवीशी;
कातर समयी, अजाब तू तर!
अरूण, भास्कर, सूरज तेजस;
सूर्य नभी, आफताब तू तर!
स्वच्छ जलाचा, तडाग हो रे;
नकोस होउ, सुराब तू तर!
उत्सुक नाही फक्त मीचरे;
माझियासम, बेताब तू तर!
साकीमध्ये, नकोस अडकू;
माप न तुज, बेहिसाब तू तर!
मी मी म्हणता, शांत होउनी;
खुलली ‘सुनेत्रा’, राब, तू तर!