फांदीवरती पोपट फार
हलवे फांदी फोगट नार
गोम्मटरायाच्या साठीच
गुरुने लिहिले गोमटसार
गझल औषधी काढा लाल
धरण्या भाळी कोमट धार
आम्रतरूच्या घन छायेत
मस्त उन्हाळी खोपट गार
प्रतिभा साकी ज्या खोलीत
नाव तिचे रे सोमट बार
धारदार जरी शस्त्र तुझे
हात करे तव बोथट वार
बळे कुणाच्या न गळा पडे
‘सुनेत्रा’ न ही लोचट हार
गझल मात्रावृत्त (मात्रा १५)