गोमटेश स्तुती – GOMATESH STUTEE


This poem is a translation of original poem written by Aachaary Nemichandra Sidhddant Chakravartee(आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती).
Aachaary wrote this Stutee in Praakrut language(गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं ).

गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं
आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती
यांच्या मूळ प्राकृत स्तुतीचा
मराठी भावानुवाद

नेत्र जयाचे जणू भासती सरोवरातिल कमलदले
मुखचंद्राची शोभा ऐसी पुनवेचा जणु चंद्र खुले
चंपकपुष्पापरी नासिका मृदुल रूप हे फुलापरी
गोमटेश्वरा प्रणाम करितो सदा सर्वदा तुम्हास मी

कंठाची ही मनोज्ञ रचना शंखाहुन सुंदर भासे
स्कंध आपुले विशाल ऐसे हिमालयाची जणु शिखरे
कटिभागाची अशी दृढता त्रिलोकातही जगनामी
गोमटेश्वरा प्रणाम करिते सदासर्वदा तुम्हास मी

विंध्यगिरीच्या भूमीवरती उभे ठाकुनी तप अपुले
भव्यात्म्याला  वैराग्याच्या मार्गी तुम्ही स्थित केले
शशिबिंबाच्या पूर्ण कलेसम रूप विमल आनंदमयी
गोमटेश्वरा प्रणाम करिते सदासर्वदा तुम्हास मी

हिरव्या हिरव्या लता माधवी विशाल देहा  लपेटती
पूजावे पद स्तुति सुमनांनी भव्य जना तरु फलदायी
स्वर्गामधुनी इंद्र अवतरे चरण पूजिण्या भूधामी
गोमटेश्वरा प्रणाम करिते सदासर्वदा तुम्हास मी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.