This Ghazal is written in Akasharganvrutta. Vrutta used is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. Here the poetess says, Ghazal is the best way to express our true feelings in poetic manner.
गझलेत बोलते मी गझलेत रांगते मी
वाऱ्यास झिंगलेल्या गझलेत डांबते मी
वेडी म्हणोत कोणी अथवा अतिशहाणी
बेधुंद मम कहाणी गझलेत कांडते मी
बाईस दु:ख जाळी बाई तिलाच टाळी
बाईपणा निराळा गझलेत मांडते मी
धर्मास गाडुनी का नावास पूजती हे
पूजा करा गुणांची गझलेत सांगते मी
या वाहिन्या नि पत्रे हितगुज नित्य करिती
सज्ञान माध्यमांशी गझलेत भांडते मी
घेऊन शस्त्र हाती हातात लेखणीचे
ठिणग्या न अक्षरांना गझलेत सांडते मी
आले फिरून गावे स्वप्नात नित्य रात्री
दमले खरी प्रियतमा गझलेत थांबते मी
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.