Akasharganvrutta used in this Ghazal is LA GAA GAA, LA GAA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA GAA. Radif in this Ghazal is Chafa. Kafiyas are Fule, Dale, Dule, Hale, Sale Zule.
कधी हा रुसे चाफा कधी हा फुले चाफा
मुक्याने हसे गाली मनाची दले चाफा
निळ्याभोर शब्दांशी करोनी खुळी मैत्री
नभापर नेणाऱ्या सुरांनी डुले चाफा
कुणाच्या खुले देठी कुणाच्या भिजे ओठी
फुलांच्या टपोऱ्या आसवांनी हले चाफा
मनाच्या तऱ्हा न्याऱ्या उगा ते फसे वेडे
कुणाला रुते बकुळी कुणाला सले चाफा
तिला वाटतेकी चांदणे बावरे प्यावे
तिचे ना चुके काही तिचाही झुले चाफा
वृत्त- ल गा गा, ल गा गा गा, ल गा गा, ल गा गा गा.