This Ghazal is written in sixteen matras. Here Radif is ‘Mhanale’. Mhanale, means ‘I said’. Kafiyas are Preet, Sangeet, Reet, fasveet, Chumbeet, Modeet, Jeet.
मी कवितेला प्रीत म्हणाले
प्रीतीला संगीत म्हणाले
डोळे माझे फितूर होता
लपाछपीला रीत म्हणाले
ते श्वासांचे नाटक होते
स्वत:स मी फसवीत म्हणाले
डांबिन तुजला मुठीमधे मी
वाऱ्याला चुंबीत म्हणाले
मोड घालते आठवणींची
साज जुना मोडीत म्हणाले
झुके पापणी मिटे बाहुली
या हरण्याला जीत म्हणाले