काय लिहू कुठे लिहू, कसे लिहू अन किती लिहू..
गुणगुणते पाखडते, सुपातुनी सांडती गहू…
गीत नवे भजन नवे, गा गा म्हणता गझल मला..
उदुंबरीं गातो रे, कोकिळ मी मग कुहू कुहू…
तू अन मी मी अन तू, हवा खावया मुंबईत..
चल जाऊ फिरावया, चौपाटीवर मस्त जुहू..
खरेखुरे जगणारे, मरणारे बहू झालेत ..
लढावया भू साठी, अजूनही आहेत बहू…
तोडुनिया पिंजऱ्यास, फांदीवरती झुलत झुलत..
बोल पिला विठू विठू, मिठू मिठू वा पिहू पिहू