This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 16 (sixteen) matras.
अस्सल होती म्हणून टिकली
अती निरागस म्हणून फसली
म्हणू नका तिज अशी कशी तू
सारे फसले तीही फसली
प्रश्न मला का अजून पडतो
माझी पहिली गाडी कुठली
उतरत असता होते गडबड
खरे खरे पण खोटे पडली
घडवत घडवत सारे सुंदर
थकली नाही स्वत:च घडली
मीच लावते माझ्या भाळी
पाणिदार मोत्यांची टिकली