चेहरे दो दो इतुके मोहक बासरीचे दो पंख जणू
आरशामध्ये प्रतिमा लोभस आगगाडीची लिंक जणू
वर्षतो धो धो मुखपृष्ठावर श्रावणीचा पाऊस निळा
अक्षरे पानी गुलकंदासम लेखणी गाळे इंक जणू
धूर वायूचे उठता वादळ अडकित्त्याने काप मणी
त्यातला काटा फुरसे घोणस नागिणीचा मी डंख जणू
ढोकळा पिझ्झा कटलेटावर ताव मारूया आज पुन्हा
सारवू मोठे तिरके अंगण फूड चापूया जंक जणू
काठ जाळूनी उदबत्ती मम चूल फुन्कीते वाकुनिया
फुंकरीने ती ठिणग्या सांडत मार मारीते फूंक जणू
कारभारी तो अडणी पाडुन चर्च देऊळे पाडितसे
आणल्या त्याने करण्या नाहक कारभारिणी शंख जणू
शंभराची नोट खरी डॉलर लक्ष कोटी सांभाळ फुला
मोतियांचे हार गळा साजुक सोनियाचे ते टंक जणू
लाकडी पावा अधरी ठेवुन गीत गायीले झांजरते
मैफिलीमध्ये जपली नाजुक ओठ दाबुनी शिंक जणू
ग्रीष्म कांतीचा हसरा कार्तिक सांजवेळी या वाहतसे
गौरवर्णी नाजुकश्या मादक तांबुलाची ती पिंक जणू
मीसुनेत्रा सावरते गायन गोठवीण्या ड्रामा सगळा
भासवीते ती करते नाटक राव गावीचा रंक जणू
मात्रा ३२
अक्षर गण वृत्त – गालगा गागा ललगा गालल गालगागागा गांललगा