तुझ्या नि माझ्या गोष्टीमध्ये – TUZYA NI MAZYA GOSHTIMADHYE


In this Ghazal(28 matras) the poetess asks, In our story who wrote storms and who wrote to tears to go away. Radif of this Ghazal is ‘Lihile koni’ and Kafiyas are Vadal, Maval, Mangal, Bhoval, Darval, Pranjal. This Ghazal is written in 28 matras.

तुझ्या नि माझ्या गोष्टीमध्ये वादळ लिहिले कोणी
गालावरच्या अश्रूंना मग मावळ लिहिले कोणी

लालजर्द ते ओठ चुंबिता वीज धरेला डसली
कारण त्या ओठांवर नकळत मंगळ लिहिले कोणी

फिरून गेले पुन्हा जन्मले फेरे असंख्य झाले
लक्ष लक्ष त्या जन्मांवरती भोवळ लिहिले कोणी

त्या सर्पांशी मैत्र कशाला हवे केतकी तुजला
आठवना तव पानांवरती दरवळ लिहिले कोणी

नको पुरावा देउस आता कळू लागले मजला
मम हृदयावर दवबिंदूंनी प्रांजळ लिहिले कोणी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.