This Ghazal is written in twenty-four(24) matras. Here Radif is ‘Bagh(बघ) and kafiyas are halavanaar, hasavanaar, fulavanaar etc.
Dahivar(दहिवर) means dewdrops. In this Ghazal the poetess believes that, dewdrops have power of creating emotions in stones and rocks. Rays of morning sun are able to creat smile on faces of crickets(रातकिडे).
दहिवर हळवे दगडांना या हलवणार बघ
ऊन कोवळे रातकिड्यांना हसवणार बघ
प्राजक्ताला छंदच जडला टपटपण्याचा
भूमातेला सुगंध त्याचा फुलवणार बघ
तारेवर मी भरली घागर घेउन फिरते
कसरत माझी तारेला या खुलवणार बघ
पाण्यामध्ये दगड टाकता उगाच कोणी
तरंग होउन खिरुन जायचे ठरवणार बघ
कातरवेळी जुनाट शल्ये मम बाळांची
सांजवात होऊन ‘सुनेत्रा’ पळवणार बघ