This Ghazal is written in sixteen(16) maatraas. Here radeef is maazyaasaathee and kaafiyaas are jal, tap(swaraanchaa kaafiyaa)etc.
दीप-धूप जल माझ्यासाठी;
माझे जपतप माझ्यासाठी
शरीर मम धर्माचे साधन;
करिते अनशन माझ्यासाठी
म्हणती कोणी युद्ध कशाला;
हे रणकंदन माझ्यासाठी
करिते भक्ती म्हणून झुरते;
अवघे तनमन माझ्यासाठी
कृष्ण होउनी नभी दाटती;
झरणारे घन माझ्यासाठी