पावसाचे दूत आले
उठवरे अता पाले
जागा भिंती छप्पराची
जिथे वाळू अंगणाले
झाडझूड स्वच्छ कर
रांगणारे बाळ चाले
चहा कर आम्हासाठी
ठेचूनिया घाल आले
करायचे खूप काही
नको म्हणू झाले झाले
हाक मार प्रेमाने तू
सून म्हणे आले आले
लेक आणि जावायाला
सांग ठेवायला भाले
मानपान कर नीट
आले सारे साली साले
सुनेत्राचा गोतावळा
फुलांसवे डोले हाले
अष्टाक्षरी गझल