दोष कुणाचा? – DOSH KUNACHA?


In this ghazal, some fundamental questions are asked. Persons make mistakes. But who is responsible for it? Why do people behave in a particular way? Whose fault is this?

But, after reading this ghazal we realize that the answers to these questions are hidden right there in the questions.

दोघे तेव्हा होते चुकले, दोष कुणाचा?
दोन मनाचे सूर न जुळले, दोष कुणाचा?

नातीसंगे आजी जाई फिल्म बघाया;
आई-बाबा भांडत बसले, दोष कुणाचा?

वेली जपती रंग कळ्यांचे, गंध गुदमरे;
फुलण्याआधी गंधच गळले, दोष कुणाचा?

त्या साऱ्यांची गीते जेव्हा गर्जत होती;
गीत न मजला तेव्हा सुचले, दोष कुणाचा?

तुमच्यावेळी असले काही, नव्हते म्हणता?
लैला-मजनू तेव्हा फसले, दोष कुणाचा?

दोष कुणाचा? दोष कुणाचा? काहो पुसता?
दोष कळाले ना जर अपुले, दोष कुणाचा?

खोट सुनेत्रामध्ये नाही, दृष्टी फसवी;
काळे चष्मे तुमचे असले, दोष कुणाचा?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.