In this Ghazal(32 matras) Some social issues are discussed in each sher. In last stanza(makta) the poetess says, women should express their soft feelings freely. Women should be given space in their family.
नको कोसळू अडवे तिडवे मनास वर्षा आवर आता
संपव मैफल खुल्या मनाने करुन भैरवी सदर आता
अंगामध्ये देवी आणुन नकोस विसरू देहभान तू
फुलव अस्मिता तव हृदयातिल घुमव अंबरी घागर आता
राजे गेले राण्या गेल्या मंत्री संत्री उदंड झाले
ससा होऊनी शोधे जनता गवतामध्ये गाजर आता
विपदा येता नेता चाले उंटावरुनी हाकित शेळ्या
संकट टळता वाटत फिरतो हत्तीवरुनी साखर आता
सुनामिने तुज गारद केले कॅटरिनाने अन लोळवले
कसा घालशिल बांध मला तू गर्जत आहे सागर आता
लाव सापळा उंदिर धरण्या सोडुन ये तू दूर तयांना
त्यासाठी तू नकोस पाळू गुरगुरणारे मांजर आता
पंख लावुनी फिरत रहा तू निळ्या अंबरी मुक्त सुनेत्रा
नकोस लपवू तरल भावना टाकून त्यावर चादर आता