This Ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
पणती तुझ्या तनूची नाही विझून गेली
नक्षत्र तारकांनी गगनी भरून गेली
सौदा कसा म्हणावा तो यज्ञ ज्ञानियांचा
धारेत पावसाच्या काष्ठे भिजून गेली
ओल्या स्मृती तुझ्या मी हृदयात लक्ष जपल्या
पण भावना उन्हाने आता सुकून गेली
गोडी पुन्हा सुखाची माझ्या घटात भरुनी
घाटावरी नदीच्या गवळण सजून गेली
प्रीती तुझी ‘सुनेत्रा’ मन-पाकळीत हसता
गालावरी खळी का नकळत पडून गेली
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.