काव्यपरीचे, चरण पकडुनी, प्राप्त जाहले, सौख्याला;
निंदा गर्हा, करुन स्वतःची, फक्त शरण मम, आत्म्याला..
तळ गाठाया, आत्मसागरी, उतरत गेले, खोल खरी;
तटस्थ राहुन, निरखित गेले, भोवतालची, मूक दरी..
गांभीर्याने, अन धीराने, दिवा उजळिता, गाभारी;
श्रद्धापूर्वक, मिटल्या नेत्री, मी जीवाची, आभारी..
भिऊन ज्यासी, बंद कवाडी, कोंडत गेले, काव्याला;
ती भीती भय, सुंदर मम सय, पहा कळाले, हृदयाला..
विविध फुलांनी, भरून परडी, येता तुजला, पहायला;
फूलपाखरे, बनून त्यातिल, फुले लागती, उडायला. .
One response to “परडी – PARADEE”
सुंदर काव्य