This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA GAA , LA LA GAA, LA GAA LA, LA LA GAA, GAA GAA LA GAA, GAA LA GAA. The name of this vrutt is SHAARDOOL-VIKRIDIT. In this ghazal kafiyaas are malaa, galhaa, balaa, talhaa( मला,गळा,बला, तळा) etc. This type of kafiyaas are known as savaee kafiyaa((सवती काफिया).
जो तो प्रश्न पुसे कठीण इतुके कोडे मला घालण्या
गुंता सोडवुनी तयार सबला माला गळा घालण्या
टाळायास नशा उपाय सगळे केले जरी व्यर्थ ते
आली ती मधुरा गळ्यात तुझिया चारू बला घालण्या
वेली वृक्ष जपावयास जमले प्राणी नि पक्षी वनी
आल्या ग्रामपऱ्या भरून कलशा पाणी तळा घालण्या
होता जन्म नवीन छान बसले वैदू तिथे गावया
शालूच्या पदरी सतेज पिकल्या आंबा फळा घालण्या
ऐना घेउन रूप रंग बघण्या बाला बसे कौतुके
तोडे पैंजण बाजुबंद बुगड्यांची शृंखला घालण्या
डौलाने निघता शशांक फिरण्या येती सख्या धावुनी
नाचे व्यंतर फौज दक्ष हृदयी नाना कळा घालण्या
शिल्पी संत जनांस खास असली आहे खरी पर्वणी
मूर्तीच्या चरणी घडीव फरशी धोंडा भला घालण्या
वृत्त – गागागा ललगा लगाल ललगा गागालगा गालगा (शार्दूल विक्रिडित)