In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way.
पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी
तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी
काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले
अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी
प्राण कळ्यांचे जपण्यासाठी श्वास तुझा हा अखंड चाले
तीर्थ घ्यावया तव चरणांचे आतुर रमणी ही गुणखाणी
तव हृदयातिल ओंकाराचा नाद घुमावा या भूमीवर
साळुंकी अन चिमण्यांनीही तालामध्ये गावी गाणी
सडपातळ ही काजूकतली कोंड्याचा हा दणकट मांडा
खेळ खेळुया भातुकलीचा आपण त्यांचे राजाराणी