पवनचक्की – PAVAN CHAKKEE


आला आला वारा रे
पाऊस आणिक गारा रे
चल चल जाऊ खेळाया
अंगणी गारा वेचाया
पागोळ्या झरझरती ग
झरे नद्या खळखळती ग
भरून ओढा वाहे ग
ऊन त्यावरी सांडे ग
सोनेरी पाणी झाले
बिंब केशरी वर डोले
शिंदीची झाडे डुलती
बकऱ्या सान तिथे चरती
हिरवळ धरणीवर हिरवी
पवनचक्की मारुत फिरवी
सूर्य निघाला झोपाया
पुन्हा पहाटे उगवाया


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.