पाऊस पडतोय मुसळधार
हवा मस्त गारेगार
वेड्या पावसा थांब रे
माझ्या घरी ये रे
स्वच्छ पंचा माझा घेऊन
चिंब मन काढ पुसून
आरामखुर्चीत माझ्या बस
माझ्याकडे पाहून हस
वाफाळलेला चहा घेत
गप्पा मारू मजेमजेत
भविष्याची चिंता सोड
हृदयापासून नाती जोड
भविष्य सांगतोय कुडमुड्या
त्याला सांग नको उड्या
जोहड धरणात धबाब रे
दरवाजातून फुसांड रे
पाणी मिळूदे जीवांना
चारा हवा गुरांना
शेत पिकेल हिरवंगार
शुभ सगळेच तारीख वार