रानात वेशीत गावात येणार पाऊस पाऊस
फेकून लाजेस मेघात येणार पाऊस पाऊस
प्रीतीस वाऱ्यात ओढीत माझ्या मनीच्या गुलाबात
ओढाळ वेल्हाळ जीवात येणार पाऊस पाऊस
वृत्तात मात्रात गीतात गात्रात पात्रात गोष्टीत
तल्लीन दूरस्थ देहात येणार पाऊस पाऊस
गात गुराखी शिवारात आनंद ओतून पाव्यात
ढंगात रंगात झोकात येणार पाऊस पाऊस
नेत्री कुणाच्या भरायास गाली सुनेत्रा झरायास
प्राजक्त होऊन दारात येणार पाऊस पाऊस
अक्षरगणवृत्त – गागाल/गागाल/गागाल/गागाल/गागाल/गागाल/
मात्रा ३०