This Ghazal is written in twenty-four maatraas. Here radif is ‘Kashaas aataa'(कशास आता) and kafiyaas are puththaa, sattaa, gaththaa, rattaa, battaa etc.
तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता
अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता
प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे
स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता
तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर
गवसेल तुला ऋद्धी, रट्टा कशास आता
आकाश चांदण्यांचे, ते दुरून लखलखते
दिवा लाव तू गगनी, बट्टा कशास आता
हे पुत्र गुंड माझे, बघ पाजणार पाणी
ताकात का मसाला, मठ्ठा कशास आता
ऐन्याने तुझिया तू, नकोस पोपट पाडू
पारावर खेळ रंग, कट्टा कशास आता
ओढणी घागरा खास, शिवेन ग तुजसाठी
कटीस नाजुक सुंदर, पट्टा कशास आता