मी लिहिते अगदी सहज सहज लिहिते
कसं लिहू काय लिहू? म्हणत म्हणत लिहितेच लिहिते
कारण… असं सहज सहज लिहायलाच मला खूप आवडतं
पण मला काय माहीत की, मी जे लिहिते त्यात असतात;
कोणाच्या काहीबाही प्रश्नांची उत्तरे !
मग तयार होते माझ्याही मनात
एक भलीमोठी प्रश्न मंजुषा!
मग मीच वाट पहात बसते
माझ्या तसल्याच अगदी सहज सहज लिहिण्याची!!