बिअर आवडे – BEER AVADE


This ghazal is written in 30 matras. Radif is tula. Tula means to you. Kafiyas are Bhang, sang, Thang, Rang, Viklang, Bang. This Ghazal is Gair musalsal ghazal because different subjects are handled in each sher.

बिअर आवडे की मदिरा तुज आवडतेका भांग तुला
या प्रश्नांची गूढ उत्तरे कशी देऊ मी सांग तुला

नशा जरी मी कधी न केली नशेमधे मी सदा असे
मी माझ्यातच मस्त अशीरे कधी लागला थांग तुला

ती प्रश्नांची गर्दी आहे सरपटणाऱ्या प्राण्यांची
नको बावरू तू चंडोला हवी कशाला रांग तुला

गरुड भरारी जरी तुझी रे वारुळातले भुजंग ते
डंख विषारी चुकव तयांचा करेल जो विकलांग तुला

पहाटवारा चुंबुन गेला जाग खरी मज आलीरे
म्हणते कोणी ऐक सुनेत्रा साद घालते बांग तुला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.