खूप म्हणजे खूप रुचली स्वाभिमानी भागिदारी
विकृतीला तुडविणारी भावनांची भागिदारी
पेरुनी मातीत मोती पीक येते सप्तरंगी
फाल्गुनाला आज कळते श्रावणाची भागिदारी
चारुशीला रामपत्नी कमलनयना जनककन्या
मैथिलीला पुरुन उरली रावणाची भागिदारी
उंबरा नाकारतो हे मैत्र वृंदा रुक्मिणीचे
का बरे त्याला पटेना अंगणाची भागिदारी
शारदेच्या चांदण्यांसम फुलुन येता रातराणी
तरुतळी स्वप्नात रमते मोगर्याची भागिदारी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.