प्रिय आमुचा देश!! – PRIY AMUCHA DESH!!


India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power.

विविध प्रांत अन विविध बोली,
रंग, रूप जरी वेश;
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

गोड गोजिऱ्या मुली आमुच्या,
शिकत राहतिल कला नी विद्या,
तृण-बाळांना सुद्धा जपतिल,

कधी न ठरवे भविष्य त्यांचे
तळहाताची रेष..भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

मुले येथली खंबिर जरी हो,
मृदू मनाची जणू फुले हो,
मात-पित्यांचा करती आदर,

निसर्गात वावरण्या साधा आहे त्यांचा वेष

भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

सातपुडा सह्याद्री हिमालय,
भारत भूचे जणु देवालय,
झेलम गंगा कृष्णा तापी,
नीर जीवांना पाजून देती
प्रेमाचा संदेश!
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.