भृकुटीवरचा तीळ आवडे
वळणदार तव पीळ आवडे
भरवतेस मज प्रेमभराने
शब्द तुझा मग गीळ आवडे
मुक्त पाखरू उडे बागडे
तुझी वारिया शीळ आवडे
करून गुन्हे थकती त्यांना
लपावयाला बीळ आवडे
सफेद कपड्यांना तू माझ्या
घातलीस ती नीळ आवडे
मोहांधांच्या पायामध्ये
बसवलीस ती खीळ आवडे
मात्रावृत्त – ८+८ =१६ मात्रा