पेरता मी बियाणे खरे नंबरी
वृक्ष चुम्बेल आता घना अंबरी
काय देऊ तुला भेट मी सुंदरी
नाद हृदयातला वाजता घुंगरी
शोधण्या फूल दुर्मीळ जे माणसा
रानवाटा फिरे मी तळी अंतरी
दावले रूप देवा तुझे मी जगा
प्राण ओतून मूर्तीतल्या कंकरी
मी लढे माझिया सावळ्या मिळविण्या
होउदे जीत वा अंत या संगरी
वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा, गा ल गा.