उडती फुलपाखरे मजेने पंख पसरुनी अवतीभवती
फुलाफुलांतिल मकरंदासव गंध उधळुनी अवतीभवती
सानथोर जीवांनी साऱ्या सुगंध प्यावा आनंदाने
सृष्टी जपण्या मंत्र साखरी जपत रहावा आनंदाने
झिंगुन वाऱ्याने लोळावे तृणपात्यांच्या अंगांगावर
गवतफुलांनी नाचत गावे तृणपात्यांच्या अंगांगावर
मोरपिसाचे कलम सरसरा उखडत जाते भयास जर्जर
अक्षररूपी ठिणगी जाळे अंधरुढींच्या भुतास जर्जर
असे लिहावे तसे लिहावे नकाच सांगू मला कुणीहो
नकाच समजू मम काव्याला गोड विषारी बला कुणीहो