मनातले गुलाब ते कसे कुठे विसावले – Manatale Gulab Te Kase Kuthe Visavale


    Jase tula jagayache
This ghazal urges us to enjoy everything that we get from life. Everything that exists in nature has its own natural beauty. We must forget bad and sad things from our past life. We should remember only the happy past and live in the present.

गझल-पूर्वप्रसिद्धी-दै.लोकमत, मंथन पुरवणी,२६ जून २००५
गझलसंग्रह-दिडदा दिडदा

जसे तुला जगायचे अता तरी जगून घे
झुरू नकोस तू मना फुलापरी फुलून घे

भरून मेघ वर्षतील राहशील तू किती
भिजून चिंब चिंब आज मोकळे रडून घे

मनातले गुलाब ते कसे कुठे विसावले
कशास व्यर्थ शोध तो अता खुले हसून घे

निशा अशी निळी कशी खुळेपणात हरवली
नकोच प्रश्न सारखे निळेपणा पिऊन घे

नशेत रंगता निळ्या मनात मंद स्पंदने
सताड नेत्रपाकळ्या हळूहळू मिटून घे

टिपूर शुभ्र चांदणे जयात गंध दरवळे
असाच नाद आतला मुकेच तू टिपून घे

वृत्त- ल गा ल गा, ल गा ल गा, ल गा ल गा, ल गा ल गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.