This Ghazal is written in aksharganvrutta. Vrutta is- LA GAA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA GAA, LA GAA GAA.
In this Ghazal the poetess says, If I wish for any good thing I get it.
मला जे आवडे ते, मला मिळतेच मिळते
दिव्यावर भाळता मी, कुणी जळतेच जळते
नका लपवून ठेवू, गुपीते खास अपुली
कुणावर कोण मरते, मला कळतेच कळते
तुझा तो डौल बघुनी, निळ्या पाण्यात हंसा
तुझे मन पाहण्यारे, प्रिया वळतेच वळते
धरेला सोस नाही, मृगजळी डुंबण्याचा
पडे पाऊस तेव्हा, भुई फळतेच फळते
हवा एसी कशाला, जपाया गौर काया
श्रमाने घाम गळता, तनू मळतेच मळते
दिवसभर लाटती ते, तरी उरलेच उंडे
सखीचे गूढ भारी, कणिक मळतेच मळते
उखाणा घेतला ना, कधीही लाजुनीरे
तुझेपण नाम जपता, बला टळतेच टळते
नको सांगू मला तू, फुलांच्या बोधगोष्टी
भ्रमर बागेत येता, सुमन चळतेच चळते
कसे घन मौन प्यावे, नको शिकवू ‘सुनेत्रा’
उन्हाने वाफ होता धुके गळतेच गळते
वृत्त- ल गा गा गा, ल गा गा, ल गा गा गा, ल गा गा (एकूण मात्रा २४)