बोलण्याचा खरे मी वसा घेतला
जोडण्याचा घरे मी वसा घेतला
बंद दारे तुटोनी हवा यावया
मारण्याचा छरे मी वसा घेतला
कातळाला फुटाया नवी पालवी
खोदण्याचा झरे मी वसा घेतला
कैक काटे फणस खोबरी सोलुनी
काढण्याचा गरे मी वसा घेतला
दोन रेखावया नेत्र दगडावरी
पाडण्याचा चरे मी वसा घेतला
वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा, गा ल गा.
3 responses to “माझा वसा – MAAZAA VASAA”
बोलण्याचा खरे मी वसा घेतला
जोडण्याचा घरे मी वसा घेतला
कातळाला फुटाया नवी पालवी
खोदण्याचा झरे मी वसा घेतला
चित्र रेखावया स्वच्छ काचेवरी
पाडण्याचा चरे मी वसा घेतला…….अप्रतिम शेर सुनेत्राजी!
*
लाजबाब !
गच्च मीठी अशी सोडतो का कुणी ?
रोखण्याचा अरे मी वसा घेतला !
-विनोद
अप्रतिम