This Ghazal is written in Aksharganvrutt, Vrutt is GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA.
Here Radif is ‘Meghmala shyamla mee(मेघमाला श्यामला मी).
वादळाशी झुंजणारी मेघमाला श्यामला मी
वीज नेत्री पाळणारी मेघमाला श्यामला मी
वारुळाला फोडणारी सर्प सारे शोधणारी
वाट त्यांना दावणारी मेघमाला श्यामला मी
बासुरीची मुग्ध भाषा जाणुनीही गूढ म्हणती
कान त्यांचे पकडणारी मेघमाला श्यामला मी
लेखणीला मोडणारे संधिसाधू ऊरबडवे
हात त्यांचे बांधणारी मेघमाला श्यामला मी
भावभरल्या मंदिरातिल प्रेममूर्ती घडवणारी
आसवांनी भिजवणारी मेघमाला श्यामला मी
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा