This Ghazal is written in sixteen(16) matras. Here radif is ‘Ekadaa’ and kafiyas are fakt, rikt, tapt, takht, gupt etc.
In this ghazal the poetess requests her dear person to speak.
मौन सोड तू, फक्त एकदा;
करावया मज, रिक्त एकदा.
होउन पुन्हा, तप्त एकदा;
जिंक मुला तू, तख्त एकदा
सैर कराया आभाळाची;
व्हावे म्हणते, गुप्त एकदा.
माझे, त्यांचे, असेल चुकले;
ताकिद दे ना, सक्त एकदा.
लढावयाची, ना भीती मज;
पुन्हा सांडते, रक्त एकदा.
नेत्रांमधुनी, हृदयी ये तू;
होइन पुन्हा, भक्त एकदा.
प्रिय सखी मी, खरी ‘सुनेत्रा’;
करुन दाव मज, जप्त एकदा.