रणांगणावर युद्ध पेटले
गळे इथे अवरुद्ध जाहले
विशाल पर्वत गर्द पाहुनी
किती दिसांनी बुद्ध हासले
हिमालयावर बर्फ फोडण्या
करीत तांडव वृद्ध नाचले
पिढी जुनी बरबाद जाहली
तरूण सारे क्रुद्ध जाहले
जळून जाता क्षार तापुनी
निळे सरोवर शुद्ध भासले
वृत्त – ल गा ल गा गा, गा ल गा ल गा.
3 responses to “युद्ध – YUDDHA”
सुंदर
छान गझल!
मीही हे काफिये घेऊन गझल लिहितो आहे!
………….प्रा.सतीश देवपूरकर
खासच!