Diwali festival is the king of Indian festivals. It is celebrated for five days. In this Ghazal five days of the Diwali festival are described.
This Ghazal is written in matravrutt(16 matras).
लखलखणारी प्रीत दिवाळी;
सडा शिंपिते उषा सकाळी.
बारस येता गोधन वंदू;
उभी अंगणी कपिला काळी.
ध्यानाची तेरस उजळूदे;
आत्म-ज्योत प्राचीच्या भाळी.
क्षुधा शमविण्या नर-असुरांची;
पांचालीची नीतळ थाळी.
मुक्ती रमणी हळद लावुनी;
हळू लपेटी हिरव्या साळी.
देठ केशरी प्राजक्तासम;
पश्चिम लावे टिळा कपाळी.
काजळ काठी नेत्र हासती;
उरी ‘सुनेत्रा’ धुके हिवाळी.