This Ghazal is personified as a woman. Here Ghazal means beloved person. Here in this Ghazal, Ghazal wears ornaments, bangles and garlands of flowers. She behaves like a shy friend.
In this Ghazal kafiyas are: Bavari (confused), Nachari(dancing with joy), Basari(flute), Shayari(Poetry), Vasari(Diary), Lajari(shy).
Here ‘निळी’ means, blue coloured. Here Blue colour is used for defining deepness of emotions of words in that Diary.
कोण म्हणाले, तुझी कालची, गझल बावरी होती;
पैंजणात ती छुमछुमणारी, प्रिया नाचरी होती.
श्वास निळा, प्राशून नाचली, घुमत राहिली वेडी;
श्यामल सुंदर श्रीरंगा ‘ती’, तुझी बासरी होती.
शब्दाशब्दावरती अडुनी, रुसून कोणी बसली;
कळले नंतर, ती तर बुजरी, सखी शायरी होती.
साथ कुणीही, दिली न मजला, तेव्हा माझ्याजवळी;
आठवणींच्या मोरपिसांची, निळी वासरी होती.
छंद हळद अन, चुडा काफिया, रदीफ मुंडावळ ‘ही’;
गझल ‘सुनेत्रा’ तुझी निरागस, वधू लाजरी होती.