माघ फाल्गुनी वसंत वारे
कृष्ण अंबरी अनंत तारे
आम्रतरू गुलमोहर फुलतो
बहर जोवरी तोवर झुलतो
पक्षी उडती दिगंत सारे
चैत्र उन्हाची रंग पंचमी
गाते सरिता दंग संगमी
गीत तिला जे पसंत गारे
ग्रीष्म काहिली येथे तगमग
सहा ऋतुंची जेथे लगबग
घेण्या अंमळ उसंत यारे
मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)