वहीचं पण स्वच्छ सुरेख;
आखीव आणि रेखीव !
लिहित असते काहीबाही
त्यावर मुक्त! कधी बांधीव!
विचार, भावना, बुद्धी
यांचं तयार होताच
एक अनोखं रसायन
हृदयातून झरझर बरसायला लागतात
शब्द शब्द !
शब्द उमटत जातात
बोटांमधून कागदावर पानावर !
त्याची कधी होते कविता
कधी होते कथा
कधी गझल कधी ललित !
लिहिता लिहिता काहीबाही
सुंदर सुद्धा सुचतं !
सुंदर काही मनाला उमगतं !
आणि मग अवघं लिहिणंच
बनून जातं
एक मोहक थरथरणारं मोरपीस !