This Ghazal is written in matravrutta. It contains twenty-six(26) matras. Radif of this Ghazal is ‘Kase lapavu’ and Kafiyas are Thase, Pise, Sase, Kase,Khise, Vase. Vasaa means Rule taken by our own desire to become happy and satisfied.
ओठांवरले तव ओठांचे ठसे कसे लपवू
डोळ्यांमधुनी दिले घेतले पिसे कसे लपवू
हृदयी उसळे नाव तुझे अन कंप सुटे श्वासा
काळजातल्या हरिणी आणिक ससे कसे लपवू
जरी कुशल मी बुडविण्यात बघ डोळीयात प्रेम
देहावरच्या रोमांचांना कसे कसे लपवू
करवंदी डोळ्यांच्या खिडक्या जांभुळ गालीचे
गुलाब ओठी पण काटेरी खिसे कसे लपवू
ओटी भरते नित्य कळ्यांनी वृक्षवल्लरींची
वाण मिळाल्यावर गंधाचे वसे कसे लपवू