हा शंख बघा जो पडला रस्त्यात
येता जाता फुंकतो कुणीही त्यास
या शंखासम ना पुद्गल तू माणसा
फुंकून पहा रे निजरुप तव प्राणाला
फुलेल ठिणगी तेव्हाच झळाळत जीवा
हे सत्य जाणण्या जाण तुझा तू आत्मा
आत्म्याशी जुळता मैत्र आणखी प्रीती
फांदीवर बसुनी कोकिळ गाणे गाती