In some families women are treated as slaves. They have no permission to talk freely. In every field there is a competition. In this Ghazal the poetess says that women should talk about their problems freely. They must come out of their home and mix with other people. Specially, women’s problems are discussed in this Ghazal(16 matras).
शल्य टोचते उरात बाई
खडा जसा तांदळात बाई
पाचोळ्यासम उडत राहिले
वाऱ्यावरची वरात बाई
लक्ष तारका नभी उजळल्या
मिणमिणते मी घरात बाई
ये वाऱ्या ये समीप माझ्या
घुसमट होते धुरात बाई
रंगबिरंगी कुंपण भवती
सारे म्हणती सुखात बाई
पंख कागदी खरे समजुनी
उडते आहे नभात बाई
कोषामध्ये नकोस राहू
नकोस हरवू स्वत:त बाई
मीही आता धावत आहे
स्पर्धा नाही कशात बाई
बघुन मुखवटे अवती भवती
रमे सुनेत्रा फुलात बाई