आत्म्यात बिंब अपुले मी नित्य पाहतेरे
आत्म्यात शुद्ध भावे मी सत्य पाहतेरे
जिनबिम्ब दर्शनाने मी धन्य धन्य झाले
किमया तुझी बघुनी मी शून्य शून्य झाले
…..
भरता भरता बुडते घागर भरून वरती येते
तरंगते पाण्यावर हलके तरून वरती येते
निवांत जीवनगाणे आता गाण्यासाठी जगते
एक एक क्षण जगून जगून घ्यावा जगण्यासाठी तरते
…
एक रुबाई
गाणे गाई
अंतर अंतर
उजळत जाई
…