In this poem beauty of the earth in the month of shravan-bhadrapad is described. Green and colourful earth is personified as beautiful and charming woman wearing colourful dress and jewelaries.
Her eyes are like clean water-pond in which lotus flowers are floating. Her hair are curly, cheecks are like rose flower. In her hand there is an umbrella of prajakta flower.
she is not uttering a single word but it seems that her eyes, face and body is speaking silently.Her mind is as beautiful as her personality.
श्रावणरमणी नीरजनयनी
कुंतल कुरळे उडती गं
गुलाब गाली सतेज भाळी
चंद्रकोर ती खुलते गं!
गुलबक्षीसम मान वेळवुन
कुंदफुलांसम हसते गं
प्राजक्ताच्या छत्रीमधुनी
इंद्रधनुवर फिरते गं!
हिरव्या हिरव्या तृणपात्यांचे
गर्द वसन ते हिरवे गं
पैंजण पायी शुभ्र सरींचे
गळ्यात पाऊस माळा गं!
गुलाब कळीसम तुझी मुग्धता
बघून घ्यावा तोरा गं
कसे फुलविते रंगपिसारे
लाजवीते त्या मोरा गं!
पाहून रमणी आरसपानी
तुझ्या रूपावर फिदाच गं
धवल शुचिता तुझ्या मनातिल
शुभ्र चांदणे झरते गं!
अंतरीच्या तव शुभ्र प्रपाता
अधीर होऊन बघतो गं
तव प्रीतीच्या श्रावणात मग
चिंब चिंब मी भिजतो गं!
श्रावणरमणी ती गुणखाणी
फुलात उतरुन हसते गं
गंध होऊनी तिच्या फुलांचा
दवबिंदूसम खिरतो गं!