This Ghazal is written in twelve(12) matras.
रंग रूप आस दाम
देह करी फक्त काम
उन्हामधे तापताच
अग्नितून गळे घाम
कृष्ण जरी कान पिळी
जिभेवरी खुले साम
यज्ञयाग घरी करा
अंतरात जपा राम
कलावंत जिंकताच
उंच उंच हात वाम
ठाक ठोक हृदयाची
चौकटीत धूम धाम
प्रेम अता फुलेलहो
रहा फक्त तुम्ही ठाम
माय माझी रेखिते
मराठीत नाव नाम
सुनेत्रात सांजरंग
हसे श्वेत श्याम शाम