काय केलं आम्ही,
सांगा तरी आम्हाला?
मानभावीपणाने
पुसता तुम्ही कोणाला?
काय केलं तुम्ही?
हे तुम्हाला माहिती आणि …
आम्हाला माहिती!
कशाने तोंडाने बोलावी बोलती?
भोगतील ते , आम्ही आणखी कोणी
आणि तुम्हीसुद्धा !
कर्माची फळे कधीना कधी
अगदी योगायोगानी!
जाऊदेहो आता
कशाला करू मी
व्यर्थ काथ्याकूट ?
गाठलंय केव्हांच
माझं मी कूट !
ज्यांनी ठेवला विश्वास स्वतःवर
ते झालेत केव्हाच पार !
होऊन जातील आता सारेच पार !