This ghazal is written in akshargan vrutt. vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA.
तुला मी मला तू अता आवडावे
तुझे नाव माझ्या पुढे मी लिहावे
जुनी प्रेमपत्रे गुलाबी मनाची
वहीतून फोटो बुके पाठवावे
पुराणातल्या त्या कथा वाङ्मयाचे
दुधी वांगियासम भरित मी करावे
जिला ना कळाली अहिंसा फुलांची
तिने का मुलांना फुका ज्ञान द्यावे
‘सुनेत्रा’ कुणाला किती भावलीरे
जयांना उमजली तयां तू पुसावे
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.